स्पर्धेच्या चारोळ्या

=============================================================
*साहित्य काव्यगंध समूह आयोजित आपल्या ग्रुपचे शब्दस्नेही कवी संजय कान्हव उर्फ (कान्हा )यांच्या वाढदिवसानिमित्त चारोळी स्पर्धेचे आयोजन केले आहे*
🦋 *हि स्पर्धा चारोळी कट्ट्यावर* 🦋

विषय:-राधेचा कान्हा
——————————
राधे तुझ्या प्रेमापोटी
भेटीस अतूर *कान्हा*
बहरली सृष्टी फुला,फळांनी
पाहून *राधे*तुझा प्रीत पान्हा.
~~~~~~०~~~~~~
दयानंद राजुळे✍
मोघा
ता.उदगीर
जि.लातूर
================
<<<<<<<<०>>>>>>>>
[5/8, 3:38 PM] gudatt vakadekr: *साहित्य काव्यगंध समूह आयोजित साहित्य चारोळी कट्ट्ा चारोळी स्पर्धेसाठी*
*स्पर्धा दिनांक ०८/०५/२०१७*
*विषय :-राधेचा कान्हा*
कान्हाच्या बासरीवर मुग्ध झाली राधा
राधेच्या रूपावर लुब्ध झाला कान्हा
कान्हाला कान्हा बनवून गेली राधा
राधेला राधा बनवून गेला कान्हा
*©रचनाकार : गुरुदत्त वाकदेकर, मुंबई*
[5/8, 3:40 PM] meena sanap beed madam: स्पर्धेसाठी
-------------
राधे तुझा कान्हा माझ्या हृदयात
नवनीत खाई हात घाली डे-यात
स्वर मुरलीचे घुमवी कुंजवनात
वेडी होऊन वाट पाही अंगणात
मीना सानप बीड
[5/8, 4:17 PM] rupali vaidya vagre nanded: स्पर्धेसाठी
............
राधेचा कान्हाही
 प्रेमरंगात भुलला
उधळून प्रितगंध
गोकुळात दंगला.
रुपाली वैद्य- वागरे.
नांदेड.
[5/8, 4:38 PM] ‪+91 98226 94845‬: 🌹🌹स्पर्धेसाठी 🌹🌹
रंग भरुन पिचकारी
कान्हा टाकी राधेवर
कावरी बावरी होऊन राधा
जिव ओवाळी कान्हावर
राजेन्द्र गिलडा माजलगाव
9822694845
[5/8, 4:51 PM] Akash Korde k: स्पर्धेसाठी
राधेचा कान्हा
भेटन्यासाठी दोन्ही जीव आतुर
मुरली वाजविता राधेचा कान्हा
येते राधा धावत पळत नदिकाठि
हळूच फुटतो शब्दांना त्यांच्या पान्हा
आकाश
खोरदे
8-5-2017
सुलेमान देवळा ता आष्टी जी बीड
[5/8, 5:02 PM] Kavita Narwde Jalnaa: स्पर्धेसाठी.....
विषय :राधेचा कान्हा
राधेविना मी आधा
यशोदेचा सांगे कान्हा
प्रेमाची झालीय बांधा
मूरलीस्वरातही दिसे राधा
कविता नरवडे (जालना )
[5/8, 5:12 PM] yogita pakhale pune: *स्पर्धेसाठी*
राधेच्या कान्हाच्या मुखारविंदातून निघाली
गीतेरूपी जीवनाची अमृतवाणी
बालक्रीडा अन रासक्रीडेतून दिली जगा
एक आदर्श चिरंतन प्रेमकहाणी
सौ योगिता किरण पाखले,पुणे
[5/8, 5:31 PM] ‪+91 97659 34025‬: स्पर्धेसाठी.......
🍁राधेच्या कान्हाचे ,
कौतुक यशोदेला,
गोपींसह यमुना जळी,
रासरंगी रंगला।
गीता सांगून जगी,
झाला तो योगेश्वर,
द्रौपदीचा पाठीराखा,
जगताचा हा ईश्वर।।
..।।।।।।।।ःःःःःः।।।।ःःः
अरुणा दुद्दलवार.🍁
[5/8, 5:38 PM] sharayu shaha kavi: ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
चारोळी स्पर्धेसाठी
*राधेचा कान्हा*
निरपेक्ष प्रेम राधेचे
आतुर होई कान्हा ।
पावले वळत जाई
तो भेटे पुन्हा पुन्हा ॥
डाॅ. शरयू शहा, मुंबई.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
[5/8, 5:56 PM] ‪+91 89831 07819‬: 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
💫*स्पर्धेसाठी-राधेचा कान्हा*💫
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
राधेचा कान्हा, कान्हाचीच राधा
चित्तचोराने हेरले प्रत्येक मनाला
निस्सीम कृष्णभक्तीत गुंग ती मीरा
बासरीवाल्याने मोहिनी घातली जगाला
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🖋* सौ. शितल सतेज मोतेवार*
🏡*नागपुर *🏡
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
[5/8, 6:06 PM] chaitrali: "स्पर्धेसाठी"
राधेचा कान्हा
जन्म झाला कृष्णाचा
फुटला यशोदेला पान्हा
नाते ज्यांचे युगायुगाचे
तेजस्वी राधेचा कान्हा
चैत्राली धामणकर
पुणे
[5/8, 6:08 PM] anuradha havelikar nanded: *स्पर्धेसाठी*
आज समाजात कान्हा
प्रत्येक मुलगा होऊ पाहतो
राधा समजून प्रत्येक मुलीची
निर्लज्जपणे छेड काढत फिरतो.
-अनुराधा हवेलीकर✍🏻
[5/8, 6:11 PM] ‪+91 98233 16838‬: स्पर्धेसाठी
आता कुठे इथे खरा
राधेचा कान्हा दिसतो
द्रौपदीच्या छळात तो
कौरवात सामील असतो
©-सिंधुसूत
तान्हाजी खोडे
9823316838
[5/8, 6:26 PM] ‪+91 95950 51030‬: ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*स्पर्धेसाठी*
*राधेचा कान्हा परी*
*मिराचा तो श्याम*
*करितो नटखट खोळ्या*
*राजा मथुरेचा तो घनश्याम...*
*निखिल देवेंद्र खराबे*
*कुही , महाराष्ट्र*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
[5/8, 6:34 PM] Bharati Solanke Aurangabad: *स्पर्धेसाठी*
*शाम तुझ्या बासरीतून*
*ऐकू येते राधा नाम*
*यशोधा म्हणे नका करू*
*माझ्या कान्हाला बदनाम*
📝भारती सोळंके
संभाजीनगर
[5/8, 6:39 PM] Chaya shete Palghar: 🌺स्पर्धा 🌺
🌸राधेचा कान्हा 🌸
चित्तचोर अन् खट्याळ राधे तुझा कान्हा.
गोपी झाल्या वेड्या ,सांग ना त्यांचा काय गुन्हा.
गायीगुरे राखितो अन बासरीचा सुर आळवितो पुन्हा पुन्हा.
शेषनाग डोलतो अन् नृत्यात तल्लीन होई राधे तुझा कान्हा.
🌺🌸🌺🌸🌸🌺चारोळी.
🌸बालकवी स्वप्निल भाऊसाहेब शेटे.
🌺जव्हार.
🌸पालघर.🌺
[5/8, 6:39 PM] Razak shaik shrirampur: 🎼🎼🎼🎼🎼 🎼🎼🎼
*स्पर्धेसाठी*
*दृष्ट नारी चे रुप बहुरूपी*
*पुतनेला सुटला पान्हा*
*नियतीचा तव खेळ महिरपी*
*मर्दन करी राधेचा तान्हा*
☃☃☃☃☃☃☃☃
*✍✍✍श्री.रज्जाक शेख*
*श्रीरामपूर*
[5/8, 6:40 PM] Razak shaik shrirampur: 🎼🎼🎼🎼🎼 🎼🎼🎼
*स्पर्धेसाठी*
*दृष्ट नारी चे रुप बहुरूपी*
*पुतनेला सुटला पान्हा*
*नियतीचा तव खेळ महिरपी*
*मर्दन करी राधेचा कान्हा*
☃☃☃☃☃☃☃☃
*✍✍✍श्री.रज्जाक शेख*
*श्रीरामपूर*
[5/8, 6:44 PM] swapnil kulkarni: *स्पर्धेसाठी*
*राधेचा कान्हा*
प्रेमाच्या झुल्यावर
झुले राधेचा कान्हा
पाव्यातल्या सूरातून
वाहे प्रेमाचा पान्हा
✍🏻©
*स्वप्नील कुळकर्णी*
पांढरकवडा जि.यवतमाळ
[5/8, 6:54 PM] shital yadav: चारोळी स्पर्धेसाठी
*राधेचा कान्हा*
राधेचा कान्हा वाजवी मधुर बासरी
वेड लावे जीवास नीलवर्णी मुरारी
देवकीचा पुत्र सकल जगाला तारी
महिमा सावळ्याची अनंत मनोहारी
सौ शितल विशाल यादव, परतवाडा
[5/8, 7:02 PM] anuradha dhamode mam: *स्पर्धेसाठी*
नटखट *राधेचा कान्हा*
गोकुळी खेळण्यात दंग
यशोदागृहात बालवयात
दाखवले ईश्वरी बहुरंग .

सौ . अनुराधा धामोडे
वाणगांव (पालघर)
०८|०५|२०१७.
[5/8, 8:52 PM] ‪+91 92256 11278‬: स्पर्धेसाठी
राधेचा कान्हा
------------------
राधेचा कान्हा खट्याळ भारी
मारितो खडा चोरीतो लोणी
प्रिया ही त्याची राधा बावरी
महाभारत घडविले त्यांनी
मेधा देसाई
चिंचवड पुणे
मो नं ९२२५६११२७८
[5/8, 8:55 PM] Vijay Vagh kvi kalamb: स्पर्धेसाठी
🌷विषय --राधेचा कान्हा🌷
राधाकान्हाची प्रीत
बहरली प्रेमाने
उजळली पहाट
नविन रंगाने
🌷🌷🌷🌷🌷🌷
विजय वाघ
यवतमाळ
७७६८०७११७६
🌷🌷🌷🌷🌷🌷
[5/8, 9:32 PM] Shashi Tribhavan sir: *स्पर्धेसाठी-*
======================
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
*तिची प्रीती मधुराभक्ती*
*व्याकुळ तिचा प्रेमाचा पान्हा,*
*चिरंतनाशी जोडून नाते*
*भेटला सखी राधेचा कान्हा!*
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
*चलभाष:8275032897*
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
Shared with https://goo.gl/9IgP7
[5/8, 9:40 PM] Chaya shete Palghar: 🌺स्पर्धेसाठी🌺
🌸राधे तुझा कान्हा🌸
यशोदेचा कृष्ण अन् देवकीचा तान्हा.
अवतरला धरतीवर नंदाचा कान्हा.
सार्या जगा वेड लावी,
राधे तुझा कान्हा.
किती नजरेत साठवू..आठवू राधे तुझा कान्हा.
🌺🌸🌺🌸🌺
🌸वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा.
🌺राधेचा कान्हा.🌺🌸🌺
🌺चारोळी.
🌸सौ.छायाताई भाऊसाहेब शेटे.
🌸जव्हार
🌺पालघर🌸
🌺(401603)
🌺8600223865🌺
[5/8, 9:42 PM] Mayuri Kadam: स्पर्धॆसाठी
8.5.2017 सोमवार
🌹🌹🌹🌹🌹
विषय- राधॆचा कान्हा
धरातळी घुमतॆ रॆ
शीळ मंजुळ वा-याची
भॆटशील ना परत उद्या
शपथ तुला राधॆच्या कान्हाची.
सौ.मयुरीकदम
ठाणॆ. मुंबई.
[5/8, 9:46 PM] veena macchi: स्पर्धेसाठी
राधेचा कान्हा
उनाड अवखळ वा-यासंगे सूर यावे
सुरातून उभारून धुंद-बेधुंद व्हावे
गीत बासरीचे ओंजळीत मी ठेऊ किती
मी राधा तू कान्हा धुंदीत नाचत रहावे
सौ.वीणा माच्छी,
घोलवड.
[5/8, 9:46 PM] ‪+91 92218 04027‬: स्पर्धेसाठी
राधेचा हा कान्हा नटखट भारी
दही दूध लोणी चोरून नेई
खोड्या काढी मटकी फोडी
लीला पाहून त्याच्या मन दंग होई
सौ वैभवी गावडे ,मुंबई
[5/8, 10:21 PM] ‪+91 98224 79412‬: स्पर्धेसाठी चारोळी
विषय राधेचा कान्हा
गुंजले स्वर वृंदावनी बासरीचे
भुलल्या गवळणी फुटला गाई पान्हा
तारिले भक्तांना मारिले दुरितांना
प्रेमाचा वर्षाव करी राधेचा कान्हा
देविदास शिवाजी बुधवंत
अहमदनगर
[5/8, 10:30 PM] rani more m: 🌹स्पर्धेसाठी🌹
~~~~~~~~~~~~~
राधेच्या कान्हाची बासुरी
सुर प्रेमाचे छेडी
अधीर स्वप्ने मधुर भक्ती
जपते मीरा वेडी
राणी मोरे
रोहा रायगड
[5/8, 10:31 PM] Sandip Waje Pune: ----स्पर्धेसाठी----
*राधेचा कान्हा*
नाव घेता सुरात,
अलगद प्रित फूलते
निर्जीव उरात....
संदीप वाजे
राजगुरुनगर पुणे
[5/8, 10:31 PM] ‪+91 84849 32146‬: स्पर्धेसाठी
वेडावतो बासरीची सुर
मज राधेच्या कान्हाचा
राहते न भान कसलेही
धीर सुटतो मग मनाचा
सायराबानू चौगुले
माणगाव
[5/8, 10:32 PM] hanmant padval sir: स्पर्धेसाठी
राधेचा कान्हा कधी
मीरेचा होतो.....?
स्वर अंतरीचा तिच्या
कधी त्यापाशी पोहचतो...॥
श्री. हणमंत पडवळ
उस्मानाबाद.
[5/8, 10:38 PM] archanaa mohankar: *चारोळी स्पर्धा*
*विषय - राधेचा कान्हा*
राधेचा कान्हा प्रेमरुपी तू
कधी खोडकर कधी भावनिक
कधी सखा तू कधी सारथी
कधी संयमी कधी दार्शनिक.
सौ. अर्चना रश्मिकांत
*(आनंदी 🌷)*
मु.+ पो.+ ता. -- तुमसर
जिल्हा -- भंडारा
[5/8, 10:46 PM] swati desai: स्पर्धेसाठी....
विषय - राधेचा कान्हा
********************
आसुराचा वध अहंकारी
नांदे नंदकिशोर गोकुळात
रासलिला खेळी राधेचा कान्हा
धुंद मीरा मुरलीच्या बासरीत
*******************
सौ स्वाती देसाई
कासारवाडी पुणे

[5/8, 10:52 PM] Nitin Gayke Sir k: *स्पर्धेसाठी.....*
*विषय- राधेचा कान्हा*
*अतुट प्रेमाच्या नात्याला*
*जपतोय राधेचा कान्हा*
*त्याच्याच प्रितीचा पाऊस*
*पडतोय गोकूळावर पुन्हापुन्हा*
*नितीन गायके*
*नेवासा*
[5/8, 10:56 PM] vrushali mam: *राधेचा कान्हा*.....
*तूच अंतरंगात माझ्या*
*मुखी तुझाच ध्यास*
*जरी कान्हा राधेचा तू*
*क्षणोक्षणि कारे तुझाच भास*........
*वृषाली वानखडे*......
अमरावती🖋
*स्पर्धेसाठी*👆🏻


स्पर्धेसाठी 
............
राधे कान्हा इथे सर्व आहे..,
सखी प्रेमालाच इथे गर्व आहे...!
प्रेम आहे तरच सर्व आहे...,
नाहीतर सर्व व्यर्थ आहे...!!
सुरेंद्र पाटील , ठाणे
==============================================================

==============================================================

==============================================================

==============================================================

No comments:

Post a Comment