स्पर्धेच्या कविता/ पोस्ट



===================================================================
*स्पर्धा स्पर्धा स्पर्धा स्पर्धा *
*🔹सा.काव्यगंध समूह आयोजित उपक्रम 10)*
**** *🔹साहित्य काव्यगंध******
*🔹दिनांक :- 9/5/2017* *वार:मंगळवार*
*🔹विषय :- कोणत्याही विद्रोही कविता*
*🔹परीक्षक :-आदरणीय मदन देवगावकर सर*
💐💐💐💐💐💐💐💐💐
*🔹संकलन: सा.का.को.कमिटी सदस्य*
🔹आयोजक....साहित्य काव्यगंध कोअर कमिटी*
*धन्यवाद...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻*

[5/9, 10:12 AM] ‪+91 84338 48762‬: *विद्रोही कविता*
*स्पर्धेसाठी*
कवी-श्री.अनिल.बा. सांगळे
यांची (गझल )
नाव:- 🌷ज्ञान-अज्ञान🌷
हे रंग रुप मला
का शाप आहे..धृ..?
माझा जन्म होणे
का पाप आहे..धृ..?
'सोसुनी मी कळा
दिवा वंशाचा लावताना,
"तरी हि गर्भाला भृणहत्येची
का तोफ आहे"?
'सांज-सकाळी तुलशी वृंदावन पुजते मी,
"तरी हि भोवती नशेचे
का रोप आहे"?
'संसारचे ओढते
रक्तावर मी ओझे,
"तरी हि जीवनाला माझ्या
का ताप आहे"?
'स्वप्न तडीस नेले
ब्रम्हांड पेलण्याचे,
"तरी हि प्रगतित विष
ओतणारा का साप आहे"?
'सर्वनाश मी केला
पापी दानवांचा'
"तरी हि भविष्याला ज्ञानाची
का झोप आहे"?
'छातीवर माझ्या अगनित वार झेलले मी,
"तरी हि ऊरात माझ्या
भयाची का धाप आहे"?
धन्यवाद आभार
🌏प्रेमतरंगकार🌎
कवी-श्री.अनिल.बा.सांगळे
संगमनेर ,नगर
मो.न.8433848762
[5/9, 10:47 AM] Abid shaikh sir: स्पर्धेसाठी कविता………
"संविधान जोपासतंय बाईपण"
बाईपण सांभाळताना माय सांगायची पोरी बाईच्या जातीनं, चापून चोपून रहावं.
पोर म्हणजे घराची आण,
बापाच्या उंबऱ्याठयाची शान,
घराण्याची अब्रू,
अन् मग इथंच तयार झालं…
बाईच्या अवती-भवती
लाज, लज्जा, क्षरम पांघरलेलं … पुरूषी वर्चस्वाच्या नागडया संस्कृतीचं,
कधीच न मिटणारं वलय.
अन् बाईचं अस्तित्वच कैद झालं.
मनुवाद्यानी निर्मीलेल्या कोंडवाडयात.
मग अचानक…,
एक बाबासाहेब नावाचा युगपुरूष आला धावून.
त्यानं ठेवला हातात बाईच्या,
माणूस म्हणून जगायला शिकवणारा,
पवित्र धर्मग्रंथ
'संविधान' त्याचं नाव…
अडगळीला पडलेलं बाईपण,
तवा लख्ख सुर्याच्या तेजाप्रमाणे
जगासमोर आलं…
आणि आज जगभर…,
कैदखाण्याचा छत तोडून,
संविधानाची पानं चाळत,
पुरूषी अंहकाराला तुडवत,
आईपण जपत-जपत
बाईपण स्वतःला सिद्ध करू लागलं आहे.
म्हणून म्हणते,
वासनांध जनावरांनो जमलंच तर बघा…एकदा बाईपण नाही; पण आईपण समजून घेता आलं तर…!
लहानपणी लुचलेल्या, आईच्या दुधाचा पान्हा आज आठवला तर …!
नाही तर मलाच पेरावी लागेल… 'घटना' बाबासाहेबांनी दिलेली.
तुमच्या या सुस्तावलेल्या…, मस्तालेल्या देहात…
किंवा
माझ्या कवितेलाच फिरवावा लागेल, संविधानरूपी विचारांचा नांगर …
तुमच्या
सळसळणाऱ्या पाशवी हस्तकावर आणि
बिघडलेल्या मस्तकावर……!
मग अभिमानाने सांगेल आईला मीही
अगं आई आजही "बाईपण" जोपासतयं माझं संविधान……!
माझं संविधान……!
माझ्या कवितेच्या रूपानं……!
……सारिका माकोडे……
शिराढोण, ता: कळंब, जि: उस्मानाबाद
[5/9, 10:55 AM] ‪+91 96573 78776‬: माझ पहील विद्रोही काव्य
स्पर्धेसाठी.....
माझेच शब्द मला दगा देतात.......
मी विद्रोही कविता करत नाही,
मी विद्रोही कविता करत नाही.....
पण का कुणास ठाऊक
माझेच शब्द मला दगा देतात,
अन त्या गांधीचा हरजीनवाद जपणार्यांच्या
काळजाचा ठाव घेतात...........
गाव गढीवर माडी माझी
गाव कूसाकडे वळलो नाही,
मह्णे उच्च कुळातील जन्म माझा
मला जातियतेन कधी छळल नाही......
कदाचित् याच वास्तवाचे चटके
कदाचित् याच वास्तवाचे चटके
माझ्या अंतरमनाला घाव देतात,
मग माझेच शब्द मला दगा देऊन
काळजाचा ठाव घेतात......
शाळेनच शिकवला सर्वधर्म समभाव
अन मास्तरच म्हणायचा,
राजवाड्यातल्या पोरांनी वेगळ्या रांगेत याव
असल्या विरोधाभासी वागण्याला
समाजकंटकच समाज जाणीवेच नाव देतात,
मग माझेच शब्द मला दगा देऊन
काळजाचा ठाव घेतात......
मनाला नेहमीच वाटत
वीद्रोही साहीत्यात न्हावून नीघाव
बाबासाहेबांच्या गाण्यावर मनसोक्त नाचव,
पण त्याच क्षणी मात्र,
माझेच समाज बांधव
वाळीत टाकण्याचे भ्याव देतात,
मग...मग माझेच शब्द मला दगा देऊन
काळजाचा ठाव घेतात......
माझ्या वेड्या शब्दांना जणू
समानतेच्या काव्याची जाण झाली,
पण अजूनही माझ्या मनी
विरोधाच्या आवाजाची हीम्मत न आली,
माझ्या अंतरीतल्या उच्च-वर्णिय षडालाही
समाज रक्षकाच नाव देतात.....
पण खर सांगतोय तुम्हाला
आजकाल माझेच शब्द,
मला दगा देऊन
काळजाचा ठाव घेतात......
.......शब्दवेडा
सचिन पाटील,
जळगाव,
९६५७३७८७७६.
[5/9, 11:05 AM] Shashi Tribhavan sir: स्पर्धेसाठी
------------
*टाहो*
*------*
बाबा,
ये तू तुडवीत सुसाट लाटा
उंच झाल्यात जिथे-तिथे बेडुकवाटा
मी इथेही दलितंच, मी असाही अस्पृश्यच
अन्यायाच्या ज्वलंत फोटोत
स्वतःला बंदिस्त केलंय,
खपलीही निघत नाही;
काळजातही रुतत नाही अशी कळ.
किती कळवळा?
जिथे तिथे माझी वेदना विकतात
'स्व'त्व विकणारे
आणि स्वार्थ उकळतात
रंगीत विदेशी मत्त फेसात.
बोन्साय केलेली माझी वेदना
प्रदर्शनात मांडून तुंबडी भरतात.
कावळे पुतळा बसवतात बाबा
अन् नासवतात सुद्धा!
आत्मग्लानी होण्यासाठी
आत्मा शुद्ध हवा
शील शुद्ध हवे
विचार शुद्ध हवेत
राजहंसी दुधागत वेगळाले.
बुद्धी विकावी?
पण पोटावर चापटी मारतात ना,
तत्त्वे विकावीत?
नाही अजिबात नाही!
हे शिकव ना त्यांना!
हलकट झालीय वासना त्यांची
कुणालाही भोग देण्याइतपत
खरंच का बाबा क्रांती झाली?
क्रांती म्हणायचे धुराला
ज्याने फक्त श्वास कोंडला
तुझे क्रांतिदूत किती इथे
नैवद्यासाठीची बिलोरी भूते!
त्या भूतांच्या मानगुटी बसून
तू वेताळ हो बाबा
म्हणूनच तू ये बाबा!
खरंच, तू ये बाबा!!
*©शशी त्रिभुवन,अस्तगाव*
Shared with https://goo.gl/9IgP7
[5/9, 11:10 AM] ‪+91 96045 57689‬: *स्पर्धेसाठी*
*विद्रोही कविता*
" आमची संस्कृती "
निर्दयी घाव घालताना
मख्ख सारे पाहती
अदय त्या रक्तांत निर्घृण
सारे षंढ नाहती....
आग लावून घरकुलांना
मशाली या पेटती
आग ती अंगा न झोंबे
थंड सारे पाहती,
बंड ते रक्तांत नाही
षंढ आमुची संस्कृती....
असो कितीही अन्याय येथे
पचविले जातात हो..
डोळसांना धैर्य नाही,
आंधळे जगतात हो..
सत्कृती वांझ होती
जोपासती विकृती
बंड ते रक्तांत नाही
षंढ आमुची संस्कृती....
अन्याय सारखा साहू
का..उचलील प्रेत बाहू
आमुचे हे सूर्य कोटी
जाहले अंधार वाहू..
दयनीय अन दुर्बल याहुनी
दुर्दशा ती कोणती..?
बंड या रक्तांत नाही
षंढ आमुची संस्कती.....!
.... सौ. प्रज्ञा घोडके चिंचवड
पुणे.....
[5/9, 11:16 AM] Kavi Ganesh Dhumal: स्पर्धसाठी......
✍ कवी लेखक...
गणेश शिवाजी धुमाळ
. विद्राेही कविता..
मी उगाच फिरताे दाराेदारी
सारी दाैलत माझ्या घरी
जळणारे आहेत भारी
माझ्या सुखावरी......
किती ही जळा जळणारांनाे
किती ही कावा करा धुर्तांनाे
एक दिवस चुकता हाेईल तुमचा
हिसाब
तेव्हाच मिळेल तुम्हाला खरा जवाब.....
सत्य चालताे आम्ही
सत्य वागताे आम्ही
कुणाचेही हेवे देवे नाही करत आम्ही.
कारण या समाजात राहाताे आम्ही.......
शेकडाे वेळा उभे राहु नव्या जाेमाने
हे समजुन घ्यावे मुर्ख माणसाने
कपट किती ही करा धुर्ताने
पुन्हा उभे राहू आम्ही नव्या जाेमाने......
विद्राेहासाठी उठऊ आवाज
सत्य हाच आमचा साज
झगडणे आमचा ध्यास
त्यातच तर खरी आहे आमची आस.......
✍ कवी लेखक....
गणेश शिवाजी धुमाळ करंदी खेडे बारे ता भाेर जि पुणे..
माेबा.9075630163
[5/9, 12:21 PM] kishor jhote: स्पर्धेसाठी
💥विद्रोही कविता💥
*गोल्ड मेडल*
*सर,*
तुम्ही म्हणालात शीक,
अन् हो खूप मोठा
दिलात मला दिलासा,
अन् हाती लेखनिला.....
*सर,*
तुमचे ते शब्द आहेत
नेहमीच माझ्या कानी,
राहून नेहमी सत्याने
आज परीक्षा ही संपवली....
*सर,*
एक गोष्ट मात्र विसरलात,
नुसत्या लेखनिने काहीच होत नाही
उज्ज्वल यशाचे साठी,
हवेत तुमच्या सारख्यांचे हात पाठी....
*सर,*
तुम्ही दिलेल्या लेखीनच्या हातात,
आज विद्रोहाचा पत्थर आहे?
अन् ज्याचे पाठी होते तुमच्या सारख्यांचे हात,
त्याचे गळी मात्र *गोल्ड मेडल* आहे,
त्याचे गळी मात्र *गोल्ड मेडल* आहे...
*किशोर झोटे*
*औरंगाबाद*
[5/9, 12:27 PM] ‪+91 97659 34025‬: स्पर्धेसाठी...
विद्रोही कविता......हुंडा,
 एक कलंक,,,,,,,,,👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾
[5/9, 12:28 PM] ‪+91 97659 34025‬: किती द्यायच्या तुजला हाका
कंठ आता उमटेना
येरे धावत मधूसुधाना(समाज पुरुष)
इथे जाहला किती आक्रोश
किती पचवावे जहाल विष
जीवन स्वप्ने होती खाक कसे तुला कळणार
सुंदर युवती स्वप्न सजविती
कसा असावा जीवन साथी
नशिबी येते त्यांच्या माती कसे तुला दिसेना
अंगावरच्या लाल साडीचा
अजुनी ओला रंग हळदीचा
तयारीत रे आहुतीच्या नको अशी वंचना
कुंड पेटला धडधड ज्वाला
हुंडा-बळीला चतावलेला
समाज देतो आहुती त्याला दे सर्वा शासना
रसातळी चालली संस्कृती
मुखवट्यात हे तोंड राक्षसी
काढून फेक अन थांबव जगती स्त्रीची विटंबना
महान मंगल स्त्रीची मूर्ती
गाणे हे तेवढ्याच-पुरती
कसल्या रूढी-प्रथा पसरती काळीज कसे तुटेना
जीवन-रथ चालावा सतपथी
समाजास दे आता सनमती
नष्ट करुनी विपरीत रीती जागव समाजमनाला ।।
येरे धावत मधूसुधना ।।
अरुणा दुद्दलवार
दिग्रस
स्पर्धेसाठी गंभीर कविता
[5/9, 12:32 PM] yogita pakhale pune: *स्पर्धेसाठी*
💥कलीयुग💥
नका झुकवू मस्तक
टाकुनिया स्वाभिमान
शिवबाचे शूरवीर
जपा तुम्ही अभिमान
कावळयाची वृत्तीच ती
कावेबाज राहणार
रोजच नवीन डाव
चपखल मांडणार
गोचिड फार झालेत
शोषण्यास सारे रक्त
तरीही कसे जमले
त्यांना पुजणारे भक्त
वेशीवर माणुसकी
कसे बरं टांगतात
साध्या सरळ लोकांचा
खेळ भारी मांडतात
सरडयाचा गुणधर्म
जागोजागी जपतात
गरीब सारी माणसं
म्हणूनच फसतात
नराधमांच्या राज्यात
लाचारांचा बलात्कार
सरला काळ थोडा की
करतो त्यांचा सत्कार
मोकाट सुटले सारे
कितीसे आवरणार
आभाळचं फाटल सारं
कुठे कुठे शिवणार?
करुया आता तयारी
खरी मात करायची
शिवबाचे सारे गुण
स्वतःमधे आणायची
सौ योगिता पाखले,पुणे
[5/9, 1:19 PM] ‪+91 98207 58823‬: स्पर्धेसाठी. विद्रोही काव्य
म्हणे समान अधिकार
सविधानानी दिलेत
स्रीयांना मानसन्मान
धर्मानीही म्हणे दिलेत
तरी ऊद्धस्त निर्भया
नागवली बिल्कीस बानु
रोज मरण मरणार्‍या
कितीतरी अजाण स्रीया
मिळतो बाईला सन्मान!
निर्णयाच पुर्ण स्वातत्र्य!
केवळ देवीचं देवघरात
कुळाचार म्हणून पुजन,
लेकीनी निवडलाच वर जर आपल्या मनानी
बाप भाऊ पहार्‍यावर
लेकीला करतात बंदिनी
तीन वेळा बोलताच
'तलाक तलाक तलाक'
घरादारा स्रीया मुकतात
काय हा धर्माचा अन्याय
शिक्षणाच माप झुकत
मिळत राहतं भावाला
कितीही हूशार असलं
तरी चुलच पाचवीला
शेतंवाडी घरं संपत्ती
सार पुरूषाच्या गाठीला
कष्टणारी घरची लक्ष्मी
मोताद होते अासर्‍याला
बायो शिक्षण हाच वर
हे मनात पक्क धर
लग्न हेच सुख नव्ह
स्वयंपुर्णतेचा मार्ग धर
अंजना कर्णिक.
[5/9, 1:20 PM] ‪+91 97659 34025‬: स्पर्धेसाठी,,,,,,विद्रोही कविता,,
हुंडाबळी
कितीक द्याव्या तुजला हाका,
कंठ आता उमटेना,
येरे धावत मधुसुदना(समाज पुरुष)।।ध्रु।।
इथे जाहला किती आक्रोश,
पचवावे किती जहाल विष,
जीवनस्वप्ने होती खाक,
काळीज कसे तुटेना।।१
अंगावर च्या लाल साडी चा,
अजून ओला रंग हळदीचा
तयारीते आहुती च्या,
नको अशी वंचना।।२
कुंड पेटला,ध डधड ज्वाला,
हुंडाबळीला चटावलेला,
सगळे देती आहुती त्याला,
कर त्यांना शसना।।३
रसातळी चालली संस्कृती,
मुखवट्यातले तोंड राक्षसी,
काढूनी फेक अन् थांबव जगती,
स्रिची विटंबना ।।४
महान मंगल स्री ची मूर्ती,
गाणे हे तेवढ्याच पुरती,
कसल्या रुढी प्रथा पसरती,,
काळीज उलटे म्हणा।।५
जीवनरथ चालण्या सत्पथी,
समाजास दे आता सन्मती,
नष्ट करुनी विपरित रीती,
जागव हलवूनी समाज मना।।६
ये रे धावत मधूसुदना।।
*************************
अरूणा दुद्दलवार.🍂
[5/9, 1:45 PM] laxman sawant sir: *स्पर्धेसाठी*
⚖ *लोकशाही*⁉
लोकशाही का म्हणावे?
अजून कळळेच नाही
लोकशाहीसारखं इथं
खरतर काही घडत नाही
सामान्य लोक सत्तेवर
कधी बसलेत का सांगा
धनदांडग्याच्या हातातच
सत्तेच्या चावीचा धागा
अपराधी भ्रष्टाचार्याला
शिक्षा झालीय का कधी?
पिडीताला न्यायालयाचा
न्याय मिळाला का कधी?
इथं जो आहे बाहूबली
तोच ठरतोय शिरजोर
कष्ट करूनही पोशिंद्याच्या
जीवाला नेहमीच घोर
लोकशाहीत हक्काच मतही
राजरोज विकल जातयं
आंधळ दळतच राहतय
अन् कुञ पीठ खातयं
बलात्कार तर दररोजच
इथं लोकशाहीवर होतोय
न्यायदेवता अंधाळी तर
राजकर्ता धृतराष्ट्र बनतोय
✍🏻 *लक्ष्मण दशरथ सावंत*
*जि.प.कें.प्रा.शा.पाल,औरंगाबाद*
© *ldsawant.blogspot.in*
[5/9, 1:58 PM] swapnil kulkarni: *स्पर्धेसाठी*
स्त्री भृणहत्येवर आधारीत विद्रोही कवीता
*पोटुशी*
तीच्या पोटुशीपणाले
लेकराचे वं डोहाळे
पायन्याले टुकावूनं
घरी गीधाडं न्याहाळे
तीले मात्तर भेवाचे
व्हते सपान पडेलं
कुसीतली तीची छाया
त्याचे लचके तुटेलं
हाडा मासाचा वं गोया
तीच्या गर्भारी वसला
माणसाच्या वं वस्तीले
अंश लेकीचा भासला
झाला कहर कहर
घावं काळानं घातला
नालीतल्या पान्यातूनं
तीचा आत्माच वायला
येलं ईश्वासाचा असा
वादळानं ऊखडला
मायं माऊलीचा देवं
नवसाने बी रुसला
✒©
*स्वप्नील कुळकर्णी*
पांढरकवडा जि.यवतमाळ
[5/9, 2:39 PM] meena sanap beed madam: स्पर्धेसाठी
---------------
*अंधश्रध्दा (विद्रोही)*
********************
अंधश्रध्देच्या वेड्या हट्टा पायी
खुडूनी टाकिता कोवळी कळी
अंधश्रध्देने लाविता असा कलंक
मुलींचा देता हकनाक का बळी ?
फुले, शाहू, आंबेडकरांनी
अधिकार दिला जगण्याचा
मुलगा मुलगी समान आहे
हक्क स्वतंत्रपणे वागण्याचा
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा
त्यासाठी अंगारे धुपारे करु नका
अंधश्रध्देत जखडूनी विचार असला
डोळे झाकूनी अंध, मुके बनू नका
स्वच्छता ठेवा तन-मन परिसराची
चालत राहू कास धरु विज्ञानाची
स्वच्छतेने आरोग्य अबाधित राही
ओळख आहे हिच खरी सज्ञानाची
गर्भात तोडीती नाळ नकोशीची
खुडून टाकीती कोवळी ही कळी
अंधश्रध्देवर मारीन आसुड विज्ञानाचा
दाभोळकरांसारखी जाणार नाही बळी
मीना सानप बीड
[5/9, 3:21 PM] Dayanand Rajule Deglur Nanded: *स्पर्धेसाठी*
=============
विषय:-विद्रोही कविता
———————————
*आत्महत्या*
~~~~०~~~~
एका शेतकर्‍याने
आत्महत्या केली
मरन्यापुर्वी त्याने
एक कविता लिहून ठेवली.....
म्हणे,
मी मेल्यावर ते येतील
वीस पंचवीस मंजुरकरून
दहा-पाच देवून
डोळे पुसून जातील.....
आणि पुनन्हा,
आमक्या-तमक्यापुढं
भलतेच मंजुरकेल्याचं
गुणगान गातील......
स्वतःच्या स्वार्थासाठी
फलान्याला विश्वासात घेतील.......
त्यांची मतंतर,
खातीलच-खितील
पर,
इतरांच लांडग्यागत
रगत बी पेतील.....
म्हणून
पुन्हा-पुन्हा होनार्‍या
अवहेलनेमुळे शेतकरी
आत्महत्या करतच राहतील.
आत्महत्या करतच राहतील...
<<<<<<<<०>>>>>>>>
कवी:-दयानंद राजुळे✍
मोघा
ता.उदगीर
जि.लातूर
मो.नं.९८६००७०२९१
================
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[5/9, 3:29 PM] aruna garje mam: स्पर्धेसाठी......
विषय....विद्रोही कविता...
आता रणचंडीका बना........
उठा उठा ग आज सख्यांनो
स्वप्नातून जाग्या व्हा ना
लक्ष्मीरुप जगून झाले
आता रणचंडिका बना.....
स्त्री पुरुष दोन्ही रुपे
देवाची तुम्ही सांगा ना
पुरुषाने जपले स्वबळा
अन् स्त्री का बनली अबला?
लक्ष्मीरुप जगून झाले
आता रणचंडिका बना........
उडदामाजि काळेगोरे
एक सारखे नसती सारे
जाणूनी घेऊनी त्या रुपांना
सतर्क तुम्ही राहा ना
लक्ष्मीरुप जगून झाले
आता रणचंडिका बना......
बुवाबाजी अन् अंधश्रध्दांना
बळी पडू नका भुलथापांना
जपून पाऊल टाका पूढचे
मुखवटे गळतील क्षणाक्षणा
लक्ष्मीरुप जगून झाले
आता रणचंडिका बना........
ज्ञानाची उजळे ज्योती
तीन पिढ्या महिला सावरती
कोषातूनी बाहेर पडूनी
झेप आकाशी घ्याना
लक्ष्मीरुप जगून झाले
आता रणचंडिका बना........
......अरुणा गर्जे.....
......नांदेड ......
[5/9, 3:44 PM] pushpa mam: भृण दया.
स्पर्धेसाठी.
नको गं आई गर्भात मारू
जग हे सुंदर मला पाहू दे
दे मला तूच अभयदान
स्री जातीची मान उंचावू दे.
शान तुमची वाढवीन मी
दोन्ही घराला उजळील मी
मी तर काळजाचा तुकडा
का चिमुकलीवर उगा हातोडा.
नको गं आई गर्भात मारू
जन्माला येऊ दे मला.....
सुंदर माझी असे आई
पाहू दे नयनांत स्वप्न आई
भाऊ , बाबांचे प्रेमरस चाखू दे
मला जगात जन्माला येऊ दे.
फुलविन जीवन शिकवून शाळा
स्री शक्तीच्या गुंफित माळा
अंगणात मांडू दे भातुकली
नको देवू कळी हिरमुसली.
दया तुलाच येऊ दे आई
नाजुक कळी अलगद उमलू दे
अमृताचा मधुर साठा तवठाई
मज जन्माला जगात येऊ दे.
सुंदर क्षितिजा पलिकडे पाहू दे
शितल चंद्रासम नित हसू दे
तुझ्या स्तुतीसुमनांचे वाचील पाठ
दाखव आयुष्याचा तू नदीकाठ.
तुजपरी संसारी मज रमू दे
राजबिंडा राजस मज लाभू दे
दिवा वंशाचा लावू दे
ऋण दायित्व मलाही फेडू दे.
म्हणून आई जन्माला येऊ दे
सुंदर जग मला पाहू दे.
पुष्पा सदाकाळ भोसरी.
9011659747.
[5/9, 3:46 PM] pushpa mam: भृण दया.
स्पर्धेसाठी.
विषय.. विद्रोही कविता..
नको गं आई गर्भात मारू
जग हे सुंदर मला पाहू दे
दे मला तूच अभयदान
स्री जातीची मान उंचावू दे.
शान तुमची वाढवीन मी
दोन्ही घराला उजळील मी
मी तर काळजाचा तुकडा
का चिमुकलीवर उगा हातोडा.
नको गं आई गर्भात मारू
जन्माला येऊ दे मला.....
सुंदर माझी असे आई
पाहू दे नयनांत स्वप्न आई
भाऊ , बाबांचे प्रेमरस चाखू दे
मला जगात जन्माला येऊ दे.
फुलविन जीवन शिकवून शाळा
स्री शक्तीच्या गुंफित माळा
अंगणात मांडू दे भातुकली
नको देवू कळी हिरमुसली.
दया तुलाच येऊ दे आई
नाजुक कळी अलगद उमलू दे
अमृताचा मधुर साठा तवठाई
मज जन्माला जगात येऊ दे.
सुंदर क्षितिजा पलिकडे पाहू दे
शितल चंद्रासम नित हसू दे
तुझ्या स्तुतीसुमनांचे वाचील पाठ
दाखव आयुष्याचा तू नदीकाठ.
तुजपरी संसारी मज रमू दे
राजबिंडा राजस मज लाभू दे
दिवा वंशाचा लावू दे
ऋण दायित्व मलाही फेडू दे.
म्हणून आई जन्माला येऊ दे
सुंदर जग मला पाहू दे.
पुष्पा सदाकाळ भोसरी.
9011659747.
[5/9, 3:57 PM] ‪+91 94030 11083‬: *#..विद्रोही काव्य स्पर्धेसाठी..#*
*हुंडा पद्धती-एक सामाजिक आजार.!*
*(शितल वायाळ ताईस समर्पित..!)*
*तिच्या आकस्मित जाण्याने*
*अवघा महाराष्ट्र झाला घायाळ..*
*हुंडया साठी अजुन किती बळी*
*जाणार आहे निष्पाप शितल वायाळ..?*
*समाजाला जसा त्रास दायक असतो*
*एखादा वाईट प्रवृत्तीचा गुंडा..*
*तसाच नवर्या मुलीला तिच्या* *आई वडिलांना भेड़सावत असतो हा हुंडा..*
*लग्न नावाच्या बाजारात होते*
*नवर्या मुलीची विक्री व मांडणी..*
*हुंडयाच्या नावाखाली इथे नियमितपणे घेतली जात आहे खंडणी..*
*मुलगा जेवढा उच्च शिक्षित तेवढा*
*जास्त आहे हुंडयाचा रेट..*
*लग्न नावाच्या बाजाराचे*
*खुप तेजीत आहे नेट..*
*परंपरांच्या नावाखाली पांढरपेशा समाजाची* *दिखाऊपनाची लग्नात वाढली आहे लूट.. आयुष्यभर फाटके घालून पै,पै जमविणाऱ्या नवर्या मुलीच्या बापाला जावयासाठी घ्यावे लागतात लाखांचे सूट-बूट..*
*आत्ताची लग्ने सोहळा उरलेली नसून ती बनली आहेत संपत्तीचे व श्रीमंतीचे प्रदर्शन*
*प्रत्येका कडेच रंगीत टिव्ही आहे असे नाही काहींना अजूनही दुर्लभ आहे BW दूरदर्शन*
*प्रत्येक आई-बापाची ईच्छा असते*
*माझ्या लेकीचे लग्न थाटा* *माटात व्हावे*
*तिला आपल्या सारखेच प्रेम* *देणारा नवरा*
*व चांगले सासर मिळावे*
*पण त्यांची ही क्षण भंगुर स्वप्ने*
*लगेच धुळीस मिळतात..*
*कारण चांगल्या स्थळांचे रेट*
*हे लाखोंच्या घरात असतात..*
*आपला सगळा समाजच फक्त कागदोपत्रीच आहे खुप सुंदर,सुज्ञ व समजदार..*
*पण खऱ्या अर्थाने हुंडा पद्धतीच्या मानसिक व सामाजिक आजाराने आहे बेजार..*
✍🏻 *प्रWIN दाभाडे पाटिल,कन्नड*✍🏻
*THE*-🅿D4⃣📧📧®
*©OPY RIGHT PROTECTED*
[5/9, 5:30 PM] Pramod mohite satara: *विद्रोही काव्य स्पर्धेसाठी...*
*कुणी समजून घ्याल का ...?*
*राज्यघटना होऊनसुद्धा*
*धर्मवाद पेटवलाय ॰॰॰*
*समानतेचा मूळ गाभा*
*बांडगुळांनी वठवलाय !! IIधृII*
*कुणी म्हणतोय सूर्य श्रेष्ठ*
*कुणी म्हणतोय चंद्र श्रेष्ठ*
*पृथ्वी जळतेय धर्मयुद्धात*
*मानवतेला करीत नष्ट*
*सगळ्यांचाच निसर्ग पण*
*जातीधर्मात बाटवलाय...II१II*
*हिर्व्या निळ्या पिवळ्या भगव्यात*
*स्वतःला मी घुसळून घेतलं*
*पाण्यासारखं निर्मळ राहून*
*सगळ्यांमध्ये मिसळून घेतलं*
*काळजात शिरुन पहा माझ्या*
*प्रेम जिव्हाळा लपवलाय II२II*
*सती गेल्यात...दासी झाल्यात*
*वेदना सोसल्यात बाईने*
*मंदीर मजीद प्रवेश नाही*
*काय करावे ताईने ?*
*अजूनही स्ञी बंदिस्त हाय*
*तिचाही आवाज मिटवलाय. II३II*
*हरवला आहे तुकाराम माझा*
*शोधून कोणी देईल का ?*
*समाधी फोडून ज्ञानदेव माझा*
*पुन्हा बाहेर येईल का ?*
*गोळ्या झाडून मुडदे पाडून*
*पुरोगामी हटवलाय...II४II*
*भिती वाटते साहेब आता*
*रुग्णालयात धर्म शिरतील*
*रक्तांच्या पिशव्यांवरती*
*जातींचे लेबल फिरतील...*
*माणूसकीतून जगण्याचा*
*मार्गच त्यांनी खुटवलाय.II५II*
*धर्म वाईट नव्हते कधीच*
*वर्ण चुकीचे होते*
*सत्तेसाठीचे...स्वार्थापोटीचे*
*कर्म चुकीचे होते*
*माणसे झालीत मेंढरं आणि*
*मेंदूसुद्धा गोठवलाय II६II*
*पुरोगामींच्या नजरेतून*
*आयुष्याकडे बघतोय मी*
*माणूस म्हणून जगा म्हणत*
*माणसासारखा जगतोय मी*
*कुणी समजून घ्याल का ?*
*आवाज त्यांनी मिटवलाय. II७II*
*कवी-प्रमोद महादेव मोहिते,*
*रा. टाळगाव,ता.कराड,*
*जिल्हा .सातारा.*
*मो.नं ९५६१७००८००*
[5/9, 5:32 PM] shirish padmakar: विद्रोही काव्य स्पर्धेसाठी..
*याद राख...*
तुमच्या रूढी परंपरांच्या ढुंगणावर लाथ मारून..
तुम्ही मांडलेल्या व्यवस्थेच्या ऊरावर
मांड ठोकून बसलेय मी.,.
आता तुमच्यात दम असेल तर उठवा मला..
पण लक्षात ठेवा..
आता मी एकटीच उठणार नाही..
माझ्यासोबत वादळ बनून उठतील..
तुम्ही माझ्या वर सोडलेल्या गिधाड नजरा..
लाळघोट्या लांडगेपणाने केलेले गलिच्छ स्पर्श अन्..
रानटी डूक्करबळाच्या जोरावर माझ्या देहाशी केलेले डूक्करभोग..!
ते सगळं आता तेजाब होवुन
वाहू लागलंय माझ्या धमन्यांतून..!!
स्पर्श केलास तरी भाजून जाशील नखशिखांत..!!
याद राख...!!!!
शिरीष पद्माकर देशमुख मु.मंगरूळ ता.मंठा जि.जालना मो 7588703716
[5/9, 5:37 PM] ‪+91 75880 55882‬: 🌹साहित्य काव्यगंध 🌹
विद्रोही कविता
स्पर्धेसाठी.........
दि 9.5.17
*संस्कृती*.......
जन्मा आली लेक बघा
आनंद झाला की नाही
द्विधा अवस्था मनाची
अजून कळेना काही.....
नका करु द्वेष बाबा
मी तुमचीच सावली
मी पाहीन कारभार
पाय तुमच्या पावली......
दादा,भैया बरोबरी
शिक्षण घेईन उच्च
कामात मदत आईला
समजु नका मला नीच......
स्व संरक्षणाचे धडे
पाठ गिरवीन झाशीचा
सासरच्याचे संरक्षण
वसा घेईन अहिल्येचा.......
माहित आहे मला ते
तुम्हा आवड लेकीची
भिती आहे बाबा तुम्हा
समाजाच्या या मेखीची......
भिऊ नका बाबा तुम्ही
कन्यादानाच्या या साजा
हुंडा घेणा-या मुलांचा
नाही वाजणारी बाजा.......
***********************
स्नेहलता विष्णूदास कुलथे
प्रा.शा.किट्टी आडगाव
माजलगाव 🌹
[5/9, 5:49 PM] Gaytri sonje nashik: *स्पर्धेसाठी योग्य असेल तर घ्यावी*
*शेतकरी* *(विद्रोह)*
आम्ही पक्क ठरवुन टाकलं
श्वासाचच गुलाम व्हायचं
सगळया भावनांचं गाठोडं
खुंटीवर अलगद टांगायचं
इथे कुणाला वेळ आहे
दु:खाचं पान चाळयला
रक्तातील नाती फक्त
हवीत खांदा द्यायला
आमचे रक्त पिऊनी यांचे
धावणे भरधाव आहे
कुंपनाने शेत खावे
सरकारचा ठराव आहे
पांढऱ्या कपडयातला
नेता बोलयला उठला
शेतकरी कान देऊन
सारे ऐकू लागला
आपलचं नशिब फुटकं
म्हणून बोल लावत बसला
त्याला उमगलंच नाही
नेता का हसला
*✍🏻गायत्री सोनजे*, नाशिक
[5/9, 7:07 PM] archanaa mohankar: *11 वी काव्य स्पर्धा*
*विषय -- विद्रोही कविता*
खुप झाले आता ....
आवडी निवडी जपणे ,
इतरांच्या !!
ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे ..
स्वत:ला साचेबंद करणे .
राहिले ना आईच्या नोकरीसाठी
मावशीकडे ....
खेड्यात होणार नाही
उत्तम शिक्षण म्हणून .
पुढे काय ????
तिचं लग्न झाल्यावर
आणलं परत ....तिच्याशी मूळातून
घट्ट झालेले नाते
उपटून ...
अगं !! मोठी ना तू ....
बघ ! कित्ती गोड तुझी सानूली बहिण !!
बाई नाही घेत तिची काळजी .
मग दुपार दोननंतर
जा शाळेत ..
मी येते तोवर दौरा आटोपून .....
..... केलस ना लग्न मनानी !
मग ... आता ऐकावं लागेल
आईबाबांचं !!!
दहा वर्षांनी घेतलं घरात ...
काय भाग्य माझे ???!!!
.... सून मी ... संसार त्यांचा
स्वयंपाक ... चटण्या ... कोशिंबीर..
गोड - धोड ... पाहुणे रावळे ..
....छान आहे हो .... ची बायको !!
अगत्यशीर ... सहनशील ...
सुगरण.... सुस्वभावी!!!!!....
पण शिकलेलीही आहे हो !!
तिचेही छंद आहेत ...
तिच्या आवडीनिवडी आहेत .
आहेत तिलाही भावना ... स्वप्ने !!!
आंतरजातीय विवाह म्हणजे ..
स्वप्नाना तिलांजली काय ?
दुसऱ्यांचीच मने जपायची काय ?....
......तू नाहीस रे तसा ...
पण कधी कधी जाणवते प्रकर्षाने...
की ...
तुलाही अपराधी वाटते की ..
तू केलास आंतरजातीय विवाह .
नकोच मला आता
ते लाळ घोटणं ...
मी जोपासणार माझे छंद !
साकारणार माझी स्वप्ने ...!!
माझे कौशल्य ... माझी भरारी!!
घेणार मी ...
तुला मान्य असेल तरी
आणि
नसेल तरीही ....
-- *सौ. अर्चना रश्मिकांत*
*(आनंदी 🌷)*
मु.+पो.+ता. -- तुमसर
जिल्हा -- भंडारा
[5/9, 7:23 PM] Sharda malpani madam: स्पर्धेत ------- माहेर
✍🏽 आली आली गं आषाढी
जमला सुवासिणींचा मेळा
सार्या सासुरवाशिणी झाल्या
आपुल्या माहेरात गोळा.
आईबाबांचा प्रेमळ हात बाई
फिरे माझ्या डोक्यावरून
बहिण भाऊ सारे गोळा
भोवती नाचती फेर धरून.
आया बाया सार्या झाल्या
सख्या शेजारणी गोळा
मैत्रीणी सख्यांचा जणू
जमला गं मोठा मेळा.
आईच्या हातची खाऊन
गोड गोड पुरणपोळी
मन तृप्त झाले त्याची
चव आगळी वेगळी.
मग रंगल्या दंगल्या
आईबाबा सवे गोष्टी
मैत्रीणीसवे केल्या
मनातील गुजगोष्टी.
ऐषो आरामाचे, मजेचे
आता संपले दिवस
येऊन ठेपला आज
सासरी जाण्याचा दिवस.
डोळयात गंगा जमुना
माझ्या आल्या दाटून
आई बाबांचाही कंठ
आला गं गहिवरुन.
उदास मनाने मग केली
माझी सासरी पाठवणी
दिल्या घरी तु सुखी राहावे
हीच इच्छा मनोमनी.
✍🏽🌹 सौ. शारदा राम मालपाणी. 🌹✍🏽@ @ @ @ @ @ @ @ @
[5/9, 8:09 PM] pushpa mam: भृण दया.
विषय... विद्रोही कविता.
स्पर्धेसाठी.
नको गं आई गर्भात मारू
जग हे सुंदर मला पाहू दे
दे मला तूच अभयदान
स्री जातीची मान उंचावू दे.
शान तुमची वाढवीन मी
दोन्ही घराला उजळील मी
मी तर काळजाचा तुकडा
संस्काराची धुरा पेलील मी.....
नको गं आई गर्भात मारू
जन्माला येऊ दे मला.....
सुंदर माझी असे आई
यश किर्ती मज लाभू दे
भाऊ , बाबांचे प्रेम जीवनी
मला जगात जन्माला येऊ दे.
फुलविन जीवन शिकवून शाळा
स्री शक्तीला वंदन करुनी
अंगणात मांडू दे भातुकली
नको टाकू कळी खुडूनी...
दया तुलाच येऊ दे आई
नाजुक कळी अलगद उमलू दे
अमृताचा मधुर साठा तवठाई
मज जन्माला जगात येऊ दे.
सुंदर क्षितिजा पलिकडे पाहता
शितल चंद्रासम नित हसू दे
तुझ्या स्तुतीसुमनांचे वाचील पाठ
जीवन नौका माझी हसू दे...
तुजपरी संसारी मज रमू दे
राजबिंडा राजस मज लाभू दे
दिवा वंशाचा लावू दे
ऋण दायित्व मलाही फेडू दे.
म्हणून आई जन्माला येऊ दे
सुंदर जग मला पाहू दे.
पुष्पा सदाकाळ भोसरी.
9011659747.
स्पर्धेसाठी हीच घ्यावी 🙏👆
[5/9, 8:09 PM] rani more m: स्पर्धेसाठी,
~~~~~~~~~~~~~~~~~
विद्रोही
*व्यथा आदिवसिंची*
चकचकित अनोळखी
माणंसच मुजोर वाटु
लागतात...मला..
चकाचक सुटबुट घालुन
येतात,माझ्या पाड्यावार...
सोशल वर्क चे झेंडे गाडायचे
असतात, ह्यांना माझ्या
लेकराच्या भूकबळीच्या
मढ़यावर.....
ही चकचकित अनोळखी
माणंसच मग हरामखोर वाटु
लागतात...मला...
आमच्या अवघड जागा
उघड्या टाकूनच बनवायची असते त्यानां डॉक्युमेंटरी ....
जिंकायचे असते नॅशनल अवार्ड,
समाजसेवेच्या कळवळ्याची जोड़त सप्लीमेंटरी...
ही चकचकित अनोळखी
माणसंच मग असंस्कृत वाटु
लागतात.. मला...
ह्यांच्या गोड गुळगुळीत भाषेलाही
असतो स्वार्थी सडका वास...
मरतानाही म्हणतात बेट्या जरा
थोडासा, पोज़ दिल्यासारखा हास...
ही चकचकीत अनोळखी
माणंसच मग निर्दयीपशु वाटु
लागतात मला...
सहज सुंदर नैसर्गिक असतात,
आमच्या जगण्याच्या कामना...
उगाच चिघळवतात जखमा,
वेदनाहारी बामच ह्यांचे
जाणवुन देतात उनाड वेदना....
ही चकचकित अनोळखी
माणंसच मग अडाणी
वाटु लागतात...मला..
जितक्या आत्मीयत्तेने तुम्ही
चघळता ना, माझ्या नागड्या
उघड्या कुपोषित,भूकबळी
संस्कृतीचे प्रश्न सेमिनारमध्ये..
तितक्याच आत्मीयत्तेने लावली
असती नोंद ह्या भटक्या जीवाची
एखाद्या भाकरी कमवायच्या
रोजंदारीच्या रांगेमध्ये.....
तर तुम्हीही झाला असतात
माझ्या ओळखीचे....
आणि ही चकचकित अनोळखी माणंसच..........
आपली वाटली असती मला.....
आपली वाटली असती मला.....
राणी मोरे
रोहा रायगड
[5/9, 8:12 PM] Surajkumari Goswami Haidrabad: *स्पर्धेसाठी*
🐜माणूस 🐜
अरे अरे माणसा असा कसा रे तू
आई- बाप ठेवून वृद्धाश्रमात
पोथी - पूराणात देव धुडतोस तू
देव मागतो का रे केव्हा तुझ्याकडे
बक-याचा खायला कधी नैवेद्य
तूझ्या पोटासाठी तू हैवाना
करतोस त्यांचाच वध
कुठल्या पूराणात लिहिली
आहे रे तुझी जात
कुठल्या काळात तू जन्म घेतलास
जातीसाठी का माणूस माणसास कापतो
होतो कसाई जातीसाठी माणूस
देवीला पूजायला करतोस नवरात्र
करून पूजा पाठ आणि तू
भक्त स्वतःला म्हणवतोस
आणि त्याच देवीस तू मारतोस गर्भातच
असा कसा रे तू देव धर्म करणारा
कर्म कोणाचेही पोथी पुराणातून
नं करणाऱ्या ,धर्मांच्या नावाने
बोंबलणा-या तू माणसा
पुण्य - पापाचा ठेवतोस तू हिशोब
मग तू एक काम कर,
तू आयुष्यातील काही क्षण देव
धर्म विसरून अनाथासाठीही
तुझा वेळ खर्च करून दाखव माणसा...........
____________सुरजकूमारी गोस्वामी ____________हैदराबाद
Shared with https://goo.gl/9IgP7
[5/9, 8:12 PM] rani more m: स्पर्धेसाठी,
~~~~~~~~~~~~~~~~~
*विद्रोही काव्य*
*थोडं समजून घे*
नैसर्गिक आहे ते बाहेर पडतं
अशुद्ध रक्त,
तिला मासीक पाळी झाली म्हणून
तुझ्या पोटात का दुखतं...
तिला म्हणतो आज नको
जाऊ देवघरात,
देव्हाऱ्यापेक्षा पवित्र जागा
आहे तिच्या उरात...
ह्या विषयावरही बोलायची
तू घातली आहेस बंदी,
बोलूदे की तिला
बागडू दे स्वछंदी....
कावळा शिवला अर्थी तिला
अस्पृश्यतेने वागवु नको,
लायकी नसेलच तुझी तर
मागे तिच्या लागू नको...
पाच दिवसांनी आंघोळी नंतर
तू तिला पवित्र मानतो काय,
हे सारं झालच नसत तर
विनापोर असती तुजी माय...
अजूनही वेळ गेली नाही
तिला आपुलकीचा दे हात,
आणी बुरसटत रहायचं असलं तर मर्दुमकीची सोड जात....
संदीप वाजे
राजगुरुनगर पुणे
[5/9, 8:13 PM] Bharati Solanke Aurangabad: *विद्रोही कविता*
स्पर्धेसाठी
मंदिर मस्जित चर्च
गुरूद्वारा स्तूप.
उभारून केले
देवतांचे कौतुक .
देणग्या देवून
उभारले देवतांचे
संगमवरी मंदिर .
येथे हृदयात जिवंत
असलेला गरीब
माणूस बेघर.
चढवतात मखमली
चादर,चंदेरी शाल
रोज नवी कापडं.
बहिण माऊलीला
अंग झाकायला
नाही फाटकं लुगड.
दानपेटी ,देणग्या
वाहे ओसंडून.
मागती निर्धन
एकपैसा गरज
भागविण्या हातपसरवून.
नैवेद्याची थाळी दूध
पंचपक्वानांनी भरली.
दारात उपाशी पोरं पोरी
म्हाताऱ्यांची पोट
खपाटी लागली .
अरे आपली एकच
देवता भारतमाता.
उभारा मंदिरे समता,
बंधुता,मानवता.
धनवानांनो
पैसा धनधान्य
पेटीत टाका.
प्रसाद म्हणून
गरजुंना वाटा.
गरीबाची सजेल
झोपडी पेटेल चूल
करून पुण्य अनमोल.
मानवाच्या हृदयातील
तेहतीस कोटी देवाला
सुख आनंद मिळेल.
गोरगरिबात वसला
देव त्यांची सेवा
हाच परमानंद.
सांगून गेले
स्वामीविवेकानंद.
📝भारती सोळंके
संभाजीनगर
[5/9, 8:30 PM] ‪+91 78750 01352‬: *स्पर्धेसाठी*
*विद्रोही कविता*
*व्यथा सासुरवाशीनिची*
हातात हात घेवून तुझा
आले मी रे तुझ्यासोबत
माहेरचा गोतावळा रे
सोडूनी सर्व माझा
सुरुवातीचे दिवस
गेले सर्व आनंदात
हळूहळू आले रे
दुःख माझ्या जीवनात
लावली अनेक बंधने
सासरी सर्वांनी
पायातील वाहन
म्हणून वागवले त्यांनी
केला वो अत्याचार
मारहान ही केली
बांधून ठेवले त्यांनी
उपाशीही ठेवली
बस झाले आता
संपली सहनशक्तीही
पेटून मी उठले आता
अवतार हा रुद्रदेवीचा
सोडनार नाही कोणालाही
करीन सर्वांना शासन
माझ्यावर केलेल्या अन्यायाला
देईन उत्तर मी खास
अबला म्हणून जगणार नाही
हाती घेवून त्रिशूल
करीन वध या
सर्व राक्षसांचा
तेंव्हाच मिळेल संतोष मला
माझ्यावर केलेल्या अत्याचारांचा...
*संध्याराणी ज. कोल्हे*
ता.कळंब जि.उस्मानाबाद
[5/9, 8:47 PM] Umakant Kale akola: स्पर्धेसाठी विद्रोही कविता
विश्वास
विश्वासाला गेले तडे
रक्ताच्या नात्याचे सांडले सडे
विश्वास दाखवून होतो घात
माणसात पसरली ही रोगाची साथ
सांगाल विश्वास कसा ठेवू...
म्हणे स्वतः ला नेते ते आज
निवडणूक लढवताना विकतात लाज
पैशाच्या जोरावर मत घेतात
निवडून येताच लोकांना लाथ मारतात
सांगाल कसा विश्वास ठेवू....
आज भाऊ भावाचा बनला वैरी
जमिन-जुमलेपाई तो चालवे सुरी
नात्याचे विकले त्याने भान
त्याला न उरला आता कुणाचा मान
सांगाल विश्वास कसा ठेवू....
रोज बातम्या ऐकतो आता
काँलेजात देशाविरुद्ध नारे चालतात
जातीपातीच्या नावावर त्यांना
ढकले जाते आज युवकांना
सांगाल कसा विश्वास ठेवू....
देशात वाढला नकक्षलवाद
मध्येच फन मारतो हा आतंकवाद
निदोर्षाची घेतात अमानुष बळी
नाही थांबत आज ही ती पाळी
सांगाल कसा विश्वास ठेवू....
बाप भावाच्या वयाचे बनतात हैवान
आया-बहीणीची लुटतात आब्रु ही शैतान
दोष काय आज नारीचा
सुरक्षित कुठे उरला सन्मान नारीचा
सांगाल कसा विश्वास ठेवू....
काय रे देवा ! ही तुझीच भुमी ना !
घेतले अवतार दाखवले चमत्कार हीच भुमी ना !
मग का आज असा पाषाण होऊन बसला ?
आता तु पण या भक्तांना विसरला ?
कसा तुझ्यावर मग मी विश्वास ठेवू...
✍🏻उमाकांत काळे,अकोला
९९२२८५५५३९
Shared with https://goo.gl/9IgP7
[5/9, 9:03 PM] sanjay kanhav sir: साहित्य काव्यगंध आयोजित
*विद्रोही* विषयावरील काव्य
स्पर्धेसाठी
👊👊👊👊👊👊👊👊
*।। उठ पेटून आता ।।*
*उठ पेटून आता घे धगधगती मशाल हाती ।।*
*बुरसटलेल्या वातीला तू लाव ज्ञानाची ज्योती* ।।धृ।।
पुरोगामी विचारांत जखडला जातीयवाद ।
नष्ट केली मानवतेची काळजातील आर्त साद ।।
जिथे गेलो तिथे आडव्याच आल्या जाती ।।1।।
स्त्रीला विटाळ करून तूच विटाळ झाला ।
आईच्या उदारातूनही तूच रे जन्म पावला ।।
का? न तुझे ही हात मग पूजनाला विटाळ होती ।।2।।
घेऊन डोक्यावर जुन्या रुढींच्या अंधश्रद्धा ।
दोरे गंडे बांधून जीवावर ओढवतोय गदा ।।
का? मग ते पुजारी शंभरी ना ओलांडती ।।3।।
स्त्रीला देतो फक्त चूल नी मूल अधिकार ।
उघड्या डोळ्यांनी बघ ती चालवतेय तलवार ।।
ईश्वरा ऐवजी माता भगिनींची कर तू आरती ।।4।।
धिक्कार आहे तुझा, या एकविसाव्या शतकात ।
विज्ञान जाणूनही तू का रमतो परंपरात ।।
कुठले देव तुमच्या अंगात येऊन नाचती ।।5।।
दररोजच बलात्कार, हुंडाबळी, किती कुकृत्य ।
नराधम सुटतोय दडपावून ते अघोरी सत्य ।।
कठोर शिक्षा देण्यास घे तू संविधान हाती ।।6।।
नास्तिक नसावा पण हृदयातील आस्तिक असावा ।
कर्तव्याच्या हाताने नशीबालाही पाझर फुटावा ।।
आत्मीयता जागून जप तू मानवतेची नाती ।।7।।
*बुरसटलेल्या वातीला तू लाव ज्ञानाची ज्योती* ।।धृ।।
👊👊👊👊👊👊👊👊
कवी संजय कान्हव, *कान्हा*
नाशिक, 9850907498
👊👊👊👊👊👊👊👊
[5/9, 9:05 PM] ‪+91 84849 32146‬: स्पर्धेसाठी
बधीर
पेटन्या रक्त असा
लागतो पुरुषार्थ येथे
गुंतवली माती
चौकशीच्या फेऱ्यात येथे
बधीर झाले मन
अन्यायापुढे इथे कसे
चंगळ वादात रमलेत
वाघ आणि ससे
लागले ग्रहण सत्याला
दाटला पुरता अंधार येथे
सोडवण्या अबलेस कोण
राहिला चारित्र्यवान येथे
हरवल्या सामाजिक जाणिवा
मग जुळतील बंध कुठून
चालला उंबराच येथे
स्वतःचे घर लुटून
पेटल्या चिता गरीबाच्या
ठोकर खाऊन येथे
श्रीमंतीच्या बिछ्यान्यावर
लोळती कोट्याधीश येथे
सायराबानू चौगुले
माणगाव जि. रायगड
[5/9, 9:31 PM] anuradha dhamode mam: *स्पर्धेसाठी*
*विद्रोहाच्या* काळ्या ढगांनी
आभाळ भरून आलंय
मुसळधार पाऊस कोसळेेेल
त्या पावसात मला थेंब बनून
लाटांच्या रूपाने वाहायचे आहे..
मखमली हिरव्यागार सृष्टीत हा
जीव गुदमरतोय कारण
उध्वस्त आसवांचे समुद्र केव्हाच
कोरडे पडले आहेत ..
माणुसकीचे प्रवाह केव्हाच्
उलटे झालेत
जखमांच्या साम्राज्यात रक्त
भळाभळा वाहायला लागलेय..
आधाराचे खांब कधीच तुटून
पडलेत
डबक्यातले,दलदलीचे आयुष्य
जगताना पावलो- पावली दुःखदर्द
जाणीवा सहन करीत बेहिशोबी
जगणं जगत आहे..
दुनियेतल्या आपमतलबीपणांचे
बेगड़ी नाते जोडण्यांत आले असून सभोवताली काटेरी कुंपण
निर्माण केले आहे या
सोंग पांघरलेल्या नात्यांचा समूळ
नायनाट करायचा आहे ..
जाणिवेच्या भावना,वेदनांचे शल्य
आघातांचे दुःख यांचे बर्फ झाले,
कारण माणसांच्या मृत्यूचे केव्हाच्
दगड होऊन पडलेत ..
मला मी म्हणून जगायचं आहे
मानवतेच्या धवल प्रवाहात
वाहायचे आहे ..
फुले,आंबेडकर दैवतांच्या
*विद्रोही* प्रेरणा प्रवाहात
एक थेंब बनून
लाटा होऊन वाहायचे आहे.

सौ.अनुराधा धामोडे
वाणगाव(पालघर)
०९|०५|२०१७.
[5/9, 9:42 PM] sharayu shaha kavi: ॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
💦🔹स्पर्धेसाठी🔹💦
विद्रोही कविता
धर्म राम गौतमऋषी.. सर्वांनी अन्यायच केला
काहीएक चूक नसताना सरळ पत्नीचा त्याग केला
उपेक्षा अवमान अवहेलना कुचंबणा अन कोंडमारा
मनूपासून स्पष्ट दिसतंय तिला कुठेच नाही थारा ॥
स्त्री -पुरुष..हे दोन घटक जर आहेत अगदी समान
मग घरी - दारी चहुकडे सारखंच हवं तिला स्थान
पैसे कमवून आणणारी बायको जर त्याला हवी
तरमग मानाची पायरीही तिला मिळायलाच हवी ॥
पत्नीचं स्थान तर दुय्यमच कृती उक्तीतून दाखवतात
टाचेखाली दाबूनठेवण्यात पती नेहमी भूषण मानतात
भय भीती जायलाच हवी जाणीवजागृती व्हाया हवी
*मी एक स्वतंत्र व्यक्ती* ही भावना रुजायला हवी
प्रत्येक पती पत्नीसाठी
व्यापक दृष्टी दाखवील तेव्हाच मग ख-या अर्थाने *स्त्रीमुक्ती*म्हणता येईल
फुलेआंबेडकरसुधारकांनी स्त्रीसाठी जे कार्य केले तेव्हाच म्हणू आनंदाने अगदीच वाया नाही गेले
डाॅ. शरयू शहा, मुंबई.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
[5/9, 9:43 PM] ‪+91 94052 69822‬: 💐स्पर्धेसाठी💐
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचे पाहिले मी चेहरे
दारासमोर भीक मागताना पहिली मी लेकरे
बंद करणार भ्रष्टाचार आणि सुखी दिवस आणणार
खरंच सांगते मॅडम मी कलेक्टर होणार
चार शब्द शिकून ज्यांनी चढवलीया वर्दी
लाच देणाऱ्यांची होते त्यांच्या भोवतीच गर्दी
माणसाला माणूस बनून माणुसकीनेच वागणार
खरचं संगते मॅडम मी कलेक्टर होणार
भ्रष्ट झाले सगळे आता मामा आणि भाऊ
मिळून सारे पक्ष म्हणतात रानमेवा खाऊ
जिद्द ,शौर्य आहे अंगी मराठी बाणा मी दाखवणार
खरचं सांगते मॅडम मी कलेक्टर होणार
-भारतभूषण जमोदेकर
[5/9, 9:49 PM] vilas salve: स्पर्धेसाठी
शिकलो आम्ही भराभर
ग्रॅज्युएट, पदव्या मिळाल्या
तरीही नाही रोजगार
मिळाला शिक्का "बेरोजगार"
सेवायोजन कार्यालयाचे उंबरठे
झिजवतो जाऊन वारंवार
नाही कुणाला कदर
नोकरीसाठी वंचित आम्ही
बेफिकीर आहे सरकार
जरी मनात असे व्यवसाय तर
कर्जासाठी बँकेला लागतो
कागदपत्रांचा भरमसाठ भडीमार
जातो वेळ सारा नाक्यावर
अन् राजकीय पक्षाच्या कळपात
टिवल्या बावल्याला येतो बहर
असलो जरी ही साधा कामगार
उसळत्या आगडोंब महागाईने
कसा पुरणार तुटपूंजा पगार ?
---------------------------
विलास साळवे
विक्रोळी, मुंबई
[5/9, 9:55 PM] prachi deshpande: स्पर्धेसाठी
********-
स्त्री जीवन
************
गृहिणीचा वावर असतो घरात
हिला काय काम असते?
सारा वेळ घरच्यांसाठी झटते
परि तिच्या कष्टांना मोल नसते
धुणीभांडी फरशीला बाई असते
दिवसभर ही काय करत असते?
प्रश्न असतो सर्वांच्या मनात
परि कष्टाला तिच्या मोल नसते
आलागेल्यांची उस्तवार करत असते
विन्मुख कुणाला पाठवत नसते
दमणूक होते तरी हसातमुख असते
परि कष्टाला तिच्या मोल नसते
मुलगी,सून ,पत्नी, आई
सासूची भूमिका निभावत असते
नातवंडाची जबाबदारी घेत असते
हवंनको सारं पहात असते
परि कष्टाला तिच्या मोल नसते
गृहित तिला धरले जाते
"गृहिणी "पदवीधारक ठरते
सारे घर आवरुन ठेवते
परि कष्टाला तिच्या किंमत नसते
दुखले खुपले सर्वांचे करते
नातीगोती जापत असते
घराला घरपण तिच्यामुळेच असते
परि कष्टाला तिच्या किंमत नसते
घरात असताना कुणालाही
तिची किंमत कळत नाही
घरापासून दूर जाताच तिची
किंमत सर्वांना कळत असते
प्राची देशपांडे

[5/9, 10:00 PM] Sahil@748: साहित्य काव्यगंध आयोजित
विद्रोही कविता स्पर्धेसाठी..
माझ हे तुझ ते
अस म्हणण्यातच गेली हयात सारी
 तू कमवलास दौलत भारी
नको दाउस तुझी हुशारी
आज माझी उद्या तुझी आहे बारी
माणूस आहेस तर माणसासारख वाग
माणूस होऊन तू आज माणुसकीला जाग
उभ्या आयुष्यात तुझ्या
तू करत राहिलास नवस
आपल्याच मर्जीप्रमाने तू
पूर्ण करत राहिलास तुझी हवस
अरे थुंकतो तुझ्या जिंदगानिवर
अन तुझ्या त्या कार्याला
सदैव देत राहिलास वागणूक अमानुष
म्हणून दोषाव म्हणल तुझ्या स्वार्थाला
विजय वाठोरे (साहिल )
ता.हिमायतनगर जि.नांदेड
9975593359

[5/9, 10:08 PM] veena macchi: स्पर्धेसाठी
अजून जात -जात ,धर्म-धर्म
शिकलाे सवरलो पण..
जिथे तिथे विचारली जाते
जात कोणती?...
त्यापरीस ओहळाचा गोटा बरा
घोषणा स्वातंत्र्याची...
अन् स्त्री म्हणून चाकोरीतलं जीणं
म्हणे भारत धर्मनिरपेक्ष..
तर मग का विचारता
धर्म कोणता?जात कोणती?
शाळाअसो,नोकरी असो
आर्थिक प्रगती विचारा
खोटं सारं खोटं
सरकारच खोटं
शिकलो नसतो तर
काळजाला खुपलं नसतं
त्यापरीस ओहळाचा गोटा बरा
असलं काही कळलं नसतं
आत्महत्या झाली नसती
दुनियादारी कुणी केली नसती

सौ.वीणा माच्छी
घोलवड

===================================================================


===================================================================


====================================================================

No comments:

Post a Comment